देवधाबा येथील संचेती विद्यालयात नविन फौजदारी कायद्याचे मार्गदर्शन

देवधाबा येथील संचेती विद्यालयात नविन फौजदारी कायद्याचे मार्गदर्शन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नवीन फौजदारी काय‌द्यांबद्दल माहिती देणे आणि जनजागृती करणे संदर्भीने दि १८ जानेवारी रोजी मोतीलाल तेजमल संचेती विद्यालय देवधाबा येथे नवीन कायद्यासंदर्भाने जनजागृती करून माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे, अतिथीम्हणून पोलिस पाटील गणेश सुरंगे, मुख्याध्यापक के. के. मोरे उपस्थित होते. यावेळी तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनींना संबोधून बदल झालेल्या नवीन कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ यातील कायदेशीर तरतुदी, I.T.Act मधील तरतुदी, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व महिला संबंधी घडणारे अपराधा संबंधाने घ्यावयाची दक्षतेबाबत तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत सूचना देऊनविद्यार्थ्यांची जागृती करण्यात आली. सध्या समाजामध्ये सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेल्या अराजकतेबाबत सतर्क राहून आपणाकडून कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही व अशा घटनांपासून स्वतःचा बचाव कसा करावा पोलिसांची व विथी सल्लागार यांची मदत कशी घ्यावी व कायदेशीर मार्गदर्शन कसे प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. संचलन बी. आर. चंदनशिव आभार गणेश माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *