महावितरणच्या पोल वरील विद्युत तारा पुन्हा चोरीला

आसलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस प्रशासन सुस्त…महावितरणच्या पोल वरील विद्युत तारा पुन्हा चोरीला

प्रतिनिधी..जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत मागील तीन महिन्यापासून दररोज म्हटलं तर वावगे ठरणार नाही चोरीच्या घटना घडतच आहेत, परंतु स्थानिक पोलीस प्रशासन सततच्या चोरीला आळा घालण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने तालुका परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे … अखेर आता चोरी झाल्यास न्याय कोणाला मागावा ? असा यक्ष प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे… याबाबत सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाला असून कायद्याचे किंवा नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण कोण करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे ….दररोज घडणाऱ्या चोरीच्या घटनेत तक्रार दिली जाते, पोलीस येतात बघतात, पंचनामा करतात आणि निघून जातात परंतु चोरांना जेरबंद करण्यास किंवा सतत होणाऱ्या चोरीच्या घटनेस आळा घालण्यात जळगाव जामोद पोलीस प्रशासन हतबल झाले आहे .. पोलीस प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेचा फायदा घेऊन 19 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव शेत शिवारातील महावितरणच्या विद्युतपोल वरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला गेल्या आहेत.. यापूर्वीसुद्धा मागील पाच महिन्यात आसलगाव परिसरातील विद्युत पोलवरील तारा मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेल्या आहेत… याबाबत तक्रार दाखल आहेत परंतु आजपर्यंत तक्रारीची निवारण झाले नाही किंवा आरोपीचा शोध सुद्धा लावण्यात आला नाही त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्याने आसलगाव येथील शेतकऱ्यांनी सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी केली असून शेतकऱ्यांच्या या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी त्रस्त शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *