श्रध्दा अन् सबुरी..भाजपाची महाभरारी शिर्डी येथे देशाचे गृहमंत्री.अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत

श्रध्दा अन् सबुरी..भाजपाची महाभरारी शिर्डी येथे देशाचे गृहमंत्री मा.श्री.अमितभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे महाविजय प्रदेश अधिवेशन संपन्न

अमिन शेख सहसंम्पादक

शिर्डी येथे देशचे गृह मंत्री अमीत शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे महाविजय प्रदेश अधिवेशन संपन्न या अधिवेशनात ना पंकजाताई मुंडे उपस्थित राहून राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मकतेचा अनुभव घेतला.आमचे नेते अमितभाई यांनी दिलेला कानमंत्र हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, दिशादर्शक ठरणार आहे. तत्पुर्वी, विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंत्री श्री आशिषजी शेलार यांनी मांडला तर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले. तर आमचे नेते व केंद्रीय मंत्री श्री.नितीन जी गडकरी यांनी उद्घाटन सत्राचा केलेला समारोप, राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उल्हासदायक असं मार्गदर्शन तसेच स्थानिक आमदार तथा मंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनोगत, या सर्व भाषणांमधून मिळालेल्या मार्गदर्शनातून अधिवेशनात सहभागी पदाधिकाऱ्यांना पुढील कामासाठी नवीन उर्जा मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *