
शेंगाव तालुक्यातील केस गळती बाधीत गावांना विदर्भा चे सुपुत्र मा.प्रतापराव जाधव देशाचे आयुषमंत्री यांनी प्रत्यक्ष जावून घेतला आढावा
संशोधनासाठी आय सी एम आर शास्त्रज्ञांची टीम येणार असल्याची दिली माहिती
अमिन शेख सहसंम्पादक शेगाव
शेगाव, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेंगाव तालुक्यातील मौजे पहुरजिरा,कठोरा,कालवड भोनगांव इत्यादी गांवासह शेगांव तालुक्यातील अकरा गावांमध्ये नागरीकांचे केस गळती होऊन टक्कल पडत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. केस गळती बाधीत गावांना देशाचे आयुष मंत्री मा प्रतापराव जाधव यांनी भेटी दिल्या रुग्णांसोबत संवाद सांघला आणि आजाराविषयी जाणून घेतले .
केस गळती हा आजार कशामुळे झालाय हे शोधण्यासाठी दिल्ली चेन्नई येथून विशेष तज्ञ डॉक्टरांची टिम बोलवण्यात आली आहे आयुर्वेद युनानी होमिओपॅथी ऍलोपॅथीचे तज्ञ डॉक्टर्स आणि आय सी एम आर चे शास्त्रज्ञ या विचित्र केस गळती आजारावरचे संशोधन करीत आहे नागरीकांनी घाबरून नये असे आवाहन केले.
हा आजार पहिल्यांदाच उद्भवला असल्याने आजाराच्या मुळाशी जावुन संशोधन करणे गरजे आहे दृष्टिकोनातून केंद्र आणि सरकारच्या आरोग्य विभागातर्फे उपाय योजना सुरु आहे . घरघुती वापरातील तेल साबण शाम्पू या उत्पादनांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे नागरिकांनीही या उत्पादनांची मुदत बाह्य झाली आहे का याचीही तपासणी करून ते वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
केस गळती होत असलेल्याच्या घटनांची वेळीच दखल घेऊन देशाचे आयुष मंत्री मा प्रतापराव जाधव म्हणाले कि तुम्हाला भेटण्यासाठी आणि धीर देण्यासाठी आलो आहे असुन केंद्र आणि राज्य सरकारचे आरोग्य विभाग 24 तास तुमच्या सेवेत राहणार आहेत असेही ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य प्रशासनाने चे अधिकारी,अन्य विविध प्रशासकीय अधिकारी व शिवसेना- युवासेना प्रमुख पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
