भाजपा च्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

मराठी साम्राज्य स्थापन करण्यात जिजाऊंचा सिंहाचा वाटा; विजयकुमार खोसे परळी येथे भाजपा च्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

अमिन शेख सहसंम्पादक शेगाव

परळी वैजनाथ ,12/01/2025 रोजी भारतीय जनता पक्ष परळी शहराच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची ४२७ वी जयंती जिजामाता उद्यान येथे साजरी करण्यात आली.परळी येथील जिजामाता उद्यान येथे रविवार दि 12 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपचे सोशल मीडिया जिल्हा संयोजक विजयकुमार खोसे यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विजयकुमार खोसे यांनी, मराठी साम्राज्य स्थापन करण्यात जिजाऊंचा सिंहाचा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारातील प्रत्येक गोष्ट जिजाऊंच्या मार्गदर्शनाने केली. कारण त्या अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होत्या तसेच मुत्सद्दी राजकारणात देखील माहीर होत्या असे प्रतिपादन यावेळी केले. राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार घालून परळी भारतीय जनता पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा महादेव ईटके, अश्विन मोगरकर, अनिश अग्रवाल, प्रितेश तोतला, मोहन जोशी, बंडूनाना कोरे, विजयकुमार खोसे, विकास हालगे, पवन तोडकरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *