
जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने जयस्तंभ चौकस्थित स्मारकस्थळी धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड तसेच मा. नगराध्यक्षा सौ पूजाताई संजय गायकवाड यांच्याहस्ते भव्य महाआरती संपन्न
अमिन शेख सहसंम्पादक शेगाव
आज दिनांक- १२ जानेवारी २०२५ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा शहरांमध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास आलेल्या जयस्तंभ चौकातील भव्य पुर्णाकृती राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारक स्थळावर समस्त जनतेला ४२७ व्या जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सवाच्या निमित्याने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड तसेच माजी नगराध्यक्षा सौ पूजाताई संजय गायकवाड यांच्याहस्ते भव्य महाआरती संपूर्ण झाली…!यावेळी त्या ठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह बुलढाणा शहरातील असंख्य माता-भगिनी तसेच शिवप्रेमी जिजाऊप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते….!जय जिजाऊ…🚩🚩
