राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार

प्रतिनिधी ..जळगाव जामोद येथील अरुणोदय बहुउद्देशीय मंडळाचा उपक्रम…युगपुरुष स्वामी विवेकानंद तथा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधन 12 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता अरुणोदय बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने जळगाव जामोद शहरात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते… 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो….. याच दिवसाचे महत्व सर्वसामान्य नागरिकांसह युवकांना समजावे आणि सुदृढ व सशक्त युवा पिढी निर्माण व्हावी यासाठी युवकांना सूर्यनमस्कारासारख्या सर्वांगीण योगाभ्यासाचे महत्व आणि प्रात्यक्षिके यादरम्यान घेण्यात आली…. स्थानिक मथाबाई चौकातील संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…. याप्रसंगी संत रुपलाल महाराज बारी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव दातीर, तालुका क्रीडा संयोजक तथा अरुणोदय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद श्रीराम येऊल, क्रीडा शिक्षक प्रतीक राऊत आदित्य कपले नंदिनी ढगे रितेश ढगे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते… तालुका क्रीडा संयोजक प्रमोद येउल यांनी याप्रसंगी सूर्यनमस्कारासह विविध क्रीडा व योगाभ्यासातील प्रात्यक्षिके प्रत्यक्ष करून दाखविली… त्याच्यासोबत तरुणांनी सुदृढ व निरोगी शरीरासह शांत आणि संयमी मनाच्या विकासासाठी सूर्यनमस्कारासह योग आणि मैदानी खेळाचे महत्व याप्रसंगी त्यांनी उपस्थित त्यांना समजावून सांगितले…. या सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच अरुणोदय क्रीडा मंडळाच्या सदस्य व खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *