आमदार मलकापूर चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकुलासाठी महत्त्वाची बैठक पार पडली

आमदार मलकापूर चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकुलासाठी महत्त्वाची बैठक पार पडली

अमिन शेख सहसंम्पादक शेगाव

मलकापूर, /01/2025 रोजी मलकापूर तालुका क्रीडा संकुलाच्या नवीन वास्तू उभारणीसाठी आज एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक माननीय आमदार श्री. चैनसुखजी संचेती साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस शासकीय कर्मचारी, पोलिस अधिकारी, खेळाडू, तसेच शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.बैठकीमध्ये मुख्यतः नवोदित खेळाडूंना उत्तम प्रकारचे साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच क्रीडा अकादमीसाठी आवश्यक असलेल्या विशेष सुविधांचे नियोजन करण्यावर देखील चर्चा झाली. उपस्थित सर्व सदस्यांनी एकत्रितपणे या प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आमदार चैनसुखजी संचेती यांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी क्रीडाक्षेत्रात नव्या खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण आणि संसाधने पुरवण्याची महत्त्वाची गरज व्यक्त केली.आमदार चैनसुख संचेती यांनी सांगीतल की क्रीडा संकुलाच्या नवीन विकासामुळे मलकापूर तालुक्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा लाभ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *