
मलकापूर शहरातील श्री संताजी महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा संपन्न.मलकापूर : शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी समाजबांधव,
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर : संत श्री जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शहरात टाळ व मृदंगाच्या गजरात, भजनाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली. प्रमुख रस्त्यांवरून संचलित शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यामध्ये सकल तेली समाजातील महिला, पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. श्री संताजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी सकाळी समाजबांधवांच्या उपस्थितीत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आले. संताजी भवन, लख्खाणी चौक, कुलमखेड, श्री गजानन महाराज मंदिर निमवाडी चौक, तहसील चौक, हनुमान चौक, बुलढाणा रोड, संत गाडगेबाबा टी पॉइंटवरून अब्दुल हमीद चौकातून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत महिला डोक्यावर तुळस व मुखी हरीनामाचा गजर करीत सहभागी झाल्या होत्या, तर पुरुष वर्गाने भजनाच्या तालात संत श्री जगनाडे महाराजांच्या जयघोष करीत संचलन केले. सजलेल्या अश्वांच्या नेतृत्वाखाली संत श्री जगनाडे महाराजांच्या पालखीचं संचलन तब्बल तीन तास चालले. येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी

शोभायात्रेत सहभागी होऊन संताजी महाराजांना अभिवादन केले. महाराजांच्या पालखीचं संचलन तब्बल तीन तास चालले. तसेच दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांच्या फोटोला अभिवादन करण्यात आले त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे, तालुकाप्रमुख रवींद्र जंगले शहर प्रमुख सुनील इंगळे उपप्रमुख मुरलीधर इंगळे निखिल पोंदे पुनम ताई भारंबे रुपेश पोलाखरे आशिष चोपडे मयूर मंडवाले राहुल जावरे उपस्थित होतेयेथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोभायात्रेत सहभागी होऊन संताजी महाराजांना अभिवादन केले.
