
दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे बैठक संपन्न.
मलकापूर प्रतिनिधी दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज दिनांक 8 12 2014 रोजी काळेगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्याकरिता गावातील दिव्यांग बांधव यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिव्यांगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच दिव्यांगाच्या समस्या जाणून घेतल्या त्याच अनुषंगाने मागील वर्षात दिव्यांगांचा पाच टक्के निधीबाबत चर्चा करण्यात आली तसेच दिव्यांग बांधवांनी यांनी सांगण्यात आले की ह्या वर्षीचा आम्हाला कुठल्याच प्रकारचा पाच टक्के निधी मिळाला नसून त्याकरिता संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी सांगितले तात्काळ ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून त्यांना दिव्यांकांचा पाच टक्के निधी खर्च करण्यात यावा असे ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून सांगतो असे सांगितले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी संघटना कसे वाढेल त्याकरिता त्यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे मलकापूर तालुका प्रमुख रवींद्र जंगले मलकापूर शहर प्रमुख सुनील इंगळे शहर उपप्रमुख मुरलीधर इंगळे मलकापूर शहर सहसचिव अमरसालवानी महिला प्रमुख पूनम ताई भारंबे गोपाल गुलगे विजय काटे कैलास भाऊ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
