
होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक गंगाधर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी होमगार्ड पथकाने जनजागृती रॅली काढली. ही रॅली पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन तहसील चौक, हनुमान चौक, निमवाडी चौक, गांधी चौक, किल्ला चौक, सालीपुरा अशी घेण्यात आली.सालीपुरा येथे ग्रामीण पोलीसांना ठाण्याच्या परिसरात पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच माळरानावर वृक्षारोपण करण्यात आले. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’ आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून अनुभवी आयुर्वेद चिकित्सक डॉ. भागवत वसे यांची तपासणी कर1ण्यात आली. इच्छुक होमगार्ड यांनी रक्तदान केले.होमगार्ड हे पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून काम करत असतात. तसेच नैसर्गिक आपत्ती कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्डचा मोलाचा वाटा आहे, असे पोलीस निरीक्षक काळे यावेळी म्हणाले.
