जळगाव जामोद तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या… महिलांच्या गळ्यातील पोत चोरीला…

जळगाव जामोद तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या… महिलांच्या गळ्यातील पोत चोरीला…

जळगाव जामोद प्रतिनिधी-

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून दिवसाढवळ्या मोटरसायकल वर येऊन चोरटे एकट्या दुकट्या महिलांना पाहून त्यांच्या जवळून जबरदस्तीने सोने पैसे मोबाईल हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले आहेत असाच प्रकार आज दिनांक आठ डिसेंबर रोजी खेर्डा खुर्द व वडगाव पाटण येथील महिलांना अडवून त्यांच्याजवळून जबरदस्तीने धमकावून खेर्डा येथील महिला कमलाबाई दामोधर शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत किंमत १८ हजार रुपये व आयटेल कंपनीचा मोबाईल किंमत हजार रुपये चोरून नेला तसेच वडगाव पाटण येथील मीनाताई घुले यांना सुद्धा एका अनोळखी मोटरसायकल स्वाराने लोड पाठ करून तोंड दाबून त्यांचे गळ्यातील सोन्याची पोत किंमत २४ हजार चोरून नेली. या दोन्हीही घटनेमध्ये या अनोळखी चोरट्याने 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जोर जबरदस्ती व मारहाण करून चोरून नेला. आरोपीचा तपास केला असता आरोपी चोरटे मिळून आले नाहीत. दोन्हीही चोरीच्या घटनांची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात. पोलीस उपनिरीक्षक शेडगे मॅडम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *