माजी आमदार चैनसुख संचेती यांची पत्रकार परिषद वचननामा पुस्तिकेचे विमोचन.

माजी आमदार चैनसुख संचेती यांची पत्रकार परिषद वचननामा पुस्तिकेचे विमोचन

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर एखादा रस्त्याचा विकास अथवा एखादा पूल बांधणे याला विकास म्हणता येणार नाही, सर्वांगीण विकासाचा जो विचार आहे तो आरोग्य, शिक्षण, रोजगार व सिंचन या चार भागात होत असतो. परंतु त्या दृष्टीने कसलीच विकासात्मक प्रगती या मतदारसंघात झालेली नाही, किंबहुना २५ वर्षाचा आमचा कालखंड व पाच वर्षाचा कार्यकाळ यांची कुठेच तुलना होऊ शकत नाही. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ विकासाच्या पोकळ गप्पाच झाल्यात, भूलथापा देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात आली असे परखड मत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मलकापूर विधानसभा मतदारसंघ भाजपा महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांनी ता. १५ नोव्हेंबर रोजी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या वचननामा पुस्तिकेचे विमोचन सुद्धा करण्यात आले. ज्यामध्ये मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाच्या व्हिजनवर भर देण्यात आला आहे.यावेळी बऱ्हाणपूरचे माजी महापौर अनिल भोसले, भाजपा नेते मोहन शर्मा, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वाघोदे, शहराध्यक्ष शंकरराव पाटील, रामभाऊ झांबरे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वसामान्यांच्या अडचणी ह्या मी माझ्या अडचणी समजूनच त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आलो आहे व भविष्यातही हा माझा प्रयत्न सदोदित कायम राहील अशी भावनिक साद सुद्धा चैनसुख संचेती यांनी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *