
मलकापूर विधानसभा मतदार संघात सरळ लढतीत चैनसुख संचेती यांचा विजय. संचेती यांना १ लाख ९ हजार ९२१ मते मिळून त्यांचा २६ हजार ३९७ मतांनी विजय.महाविकास आघाडीचे राजेश एकडे यांना मिळाली ८३ हजार ५२४ मते.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर विधानसभा मतदार संघात मलकापूर विधानसभा मतदार संघात सरळ लढतीत चैनसुख संचेती यांचा विजय. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे मध्ये सरळ सरळ लढत असताना भाजपाचे उमेदवार चैनसुख संचेती यांनी भाराकोंचे उमेदवार राजेश एकडे यांचा २६ हजार ३९७ मतांनी बारुण पराभव करीत भाजपाचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या मलकापूर विधानसभा क्षेत्रावर पुन्हा भाजपाचा झेंडा फडकविला आहे. शहरातील महायुतीच्या कार्यकत्यीकडून त्यांचा विजय जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. गत २५ वर्षांपासून मलकापूर विधानसभा मतदार संघातर एक हाती सत्ता मिळविलेले चैनसुख संचेती यांचा २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजेश एकडे यांनी पराभव करून भाजपाचा वालेकित्ता मानल्या जाणान्या मलकापूर मतदार संघावर विजय मिळवला होता. मात्र यावेळी मलकापूर विधानसभा मतदार संघासाठी महायुती भाजपतर्फे चैनसुख संचीती यांना सातल्यांदा उमेदवारी देऊन पुन्हा रणांगणात उभेकेले होते. त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी तर्फे भाराकीचे राजेश एकडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये मलकापूर विधानसभा क्षेत्रातून ७९, १७८क्के मतदान झाले. आज मतदानाचा निकाल जाहीर झाला असता मलकापूर मतदार संपावर चैनसुख संचेती यांनी विजय मिळवीत पुन्हा भाजपाचा झेंडा फडकविला आहे. राजेश एकडे यांना ८३ हजार ५२४ मते मिळाली तर चैनसुख संचेती यांना १ लाख ९ हजार ९२१मते मिळून त्यांनी २६ हजार३९७ मतांनी विजय.मिळवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महायुती ये सरकार स्थापन होत असताना मलकापूर विद्यानसभा मतदारसंघावर सुद्धा महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने महायुतीच्या कार्यकत्रीमध्ये एक उत्साहपूर्ण जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाचे समीकरण पाहता या विजयामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केलेले नियोजन त्याचबरोबर एकत्रीकरण यामुळे महायुतीचा विजय झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
