जळगाव जामोद तालुक्यात डोक्यात दगड मारून एकाचा खून… आरोपीस पोलिसांनी केली अटक..

जळगाव जामोद तालुक्यात डोक्यात दगड मारून एकाचा खून… आरोपीस पोलिसांनी केली अटक…

जळगाव जामोद प्रतिनिधी-

जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम चारबन येथे एका कार्यक्रमात जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात दगड मारून 65 वर्षीय वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली.. सविस्तर असे की ग्राम चारबन येथे आरोपी नकासिंग गदास कोठारी राहणार निमखेडी तालुका जळगाव जामोद हल्ली मुक्काम बाळापुर जिल्हा अकोला हा कार्यक्रमानिमित्त चारबन येथे आला होता. जुन्या वादातून त्याने मृतक बुटासिंग सुतारसिंग जमरा राहणार निमखेडी वय ६५ त्याच्यासोबत वाद घातला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्यातच आरोपीने बाजूला पडलेला दगड उचलून मृतकाच्या डोक्यात मारला दगड डोक्यात लागल्याने रक्ताच्या धारावाहू लागल्याने त्यातच बुटासिंग जमरा याचा मृत्यू झाला. घटनेची तक्रार निमखेडी येथील कमीस खरात यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने आरोपी नकासिंग कोठारी याच्या विरोधात कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी एम एम खान, पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, महिला पोलीस उपनिरीक्षक शेडगे मॅडम यांनी घटनास्थळाला भेट दिली व घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *