मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेबांची झाडेगाव शाळेला भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेबांची झाडेगाव शाळेला भेट

प्रतिनिधी जळगाव जामोद दिनांक 8/ 10 /2024 मंगळवार रोजी माननीय श्री .खरात साहेब- मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा ,माननीय श्री मोहन साहेब- उपमुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा ,श्री तापी साहेब- गटविकास अधिकारी जळगाव जामोद ,श्री फंड साहेब -गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद ,श्री मोरे साहेब- विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांनी सकाळी 10:45

वाजता जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा झाडेगाव येथे अचानक भेट दिली असता, शालेय अध्यापनाचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले.शाळेच्या निसर्गरम्य, नयनरम्य वातावरणाने सर्वांचेच मन वेधून घेतले. शाळेतील टापटीपपणा, परिसराची स्वच्छता, इमारतीवरील आकर्षक शैक्षणिक चित्र व रंगरंगोटी, परिसरातील बहुउपयोगी वृक्षांची लागवड व त्यांची जोपासना, शालेय परिसराचे सुशोभीकरण, शाळेचा प्लास्टिक मुक्त परिसर पाहून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात साहेब यांनी शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत जळगाव जामोद तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले .शाळेत प्रवेश

करता क्षणी त्यांनी समाधान व्यक्त केले. थेट इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश करत त्यांनी 15 ते 20 मिनिटे विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. पाढे, गणितीय क्रिया ,विविध इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग यासोबतच सामान्य ज्ञानावर आधारित विविध प्रश्न विचारत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बोलकं केलं. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून शाळेच्या शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले तसेच काही बाबतीत सुधारणा करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचनाही केल्या. जिल्ह्यातील उच्चपदस्थ व्यक्ती असून देखील आपल्या पदाचा कुठलाही बडेजाव न करता विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला, यातूनच त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता याविषयी असणाऱ्या आपुलकीची कल्पना येते. शाळेच्या विविध गरजा तसेच समस्या जाणून घेत त्यांनी त्या ताबडतोब पूर्ण करण्यासंदर्भात ग्रामसेवक तसेच सरपंचांना सूचना दिल्या. शाळेच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र मेहेंगे सर यांचे अभिनंदन केले, तसेच शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . शाळेलगत असणाऱ्या अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील अंगणवाडी सेविका सौ छाया प्रशांत तायडे यांच्याकडून अंगणवाडीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खरात साहेबांची ही ग्रेट भेट शाळेच्या विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल .यावेळी खांडवी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुनील हागे सर तालुका वैद्यकीय अधिकारी सौ पाटील मॅडम , सौ घोलप मॅडम, गावचे सरपंच ,ग्रामसेवक आशा वर्कर ,दोन्ही केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री प्रशांत भाऊ तायडे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *