मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा प्रथम क्रमांक प्राप्त जि प शाळा झाडेगांव ला मुख्य कार्यकारी अधिकारी खरात याची भेट

जळगाव तालुक्यातील मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा प्रथम क्रमांक प्राप्त जि प शाळा झाडेगांव ला मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेब याची भेट

प्रतिनिधी जळगाव जामोद ऐसेअधिकारी येती आणिक,स्मृती ठेवूनिया जाती !जि.प. बुलढाणा येथे नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष तथा अष्टावधानी व्यक्तित्त्वाचे धनीअसलेले एक कर्तव्यपरायण भारतीय प्रशासन सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी मा. ‘श्री.गुलाब खरात साहेब ‘हे जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्याच्या विविध विकास कामाचा आढावा घेण्याच्या दौर्‍यावर असतांना झाडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या प्रशासकिय मंजूरात मिळालेल्या कामाची पाहणी करीता ग्रामपंचायत कार्यालयात डोकावले. एक उच्च पदस्थ अधिकारी आपल्या गावात आल्यानंतर गावाचे खर्‍याअर्थाने देवालय असलेल्या आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा अभियानात तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या शाळेला मा.सीईओ साहेबांनी भेट द्यावी ही उर्मी मनात असलेले येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत तायडे यांना राहवले नाही व त्यांनी मा. साहेबांना आमची शाळा पाहण्याचा मनोदय बोलून दाखवला. शिक्षणक्षेत्राविषयी अतिव तळमळ असलेल्या साहेबांनी लगेच होकार दिला आणि मा. साहेबांनी जि. प. म. उ. प्रा. शाळा झाडेगाव हे नामाभिधान धारण केलेल्या व तालुक्यातील प्रथम क्रमांकाची शाळा हे बिरुद धारण करुन मोठ्या ऐटीत उभ्या असलेल्या सुंदर शाळेत प्रवेश केला आणि काय आश्चर्य साहेबांच्या वाणीतून सुखद शब्द बाहेर पडले ते म्हणजे “व्वा सुंदर!”आणि येथेच गड जिंकल्याचा आनंद गटशिक्षणाधिकारी श्री. वामनराव फंड, केंद्र प्रमुख श्री. सुनील हागे सर व ज्यांच्या मनात सारखी धाकधाक चालू होती असे शाळेचे हरहुन्नरी मुख्याध्यापक श्री. रविंद्र मेहे़ंगे सर व त्यांच्या शिक्षक वर्गाला झाला. विशेष म्हणजे आपण मा. साहेबांना शाळा भेटीच्या केलेल्या आग्रहाचे सोने झाल्याचा आनंद येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांतजी तायडे यांच्या चेहर्‍यावर विलसत होता. “हम काबील हो या न हो लेकीन काबिलीयतकी ईम्तेहान जरुर लेनी चाहिए”या ओळींप्रमाणे आपण एका आव्हाणा च्या अग्निदिव्यातून पार पडल्या सारखे सर्वांनाचं वाटले. आता खर्‍या सत्वपरिक्षेला सामोरे जायची वेळ म्हणजे मा. खरात साहेबांचा वर्गातील प्रवेश ! मा. साहेबांनी इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश करताच त्या चिमुरड्यांच्या मुखारविंदातून “गुड मार्निंगचा” गोड आवाज एका तालासुरात ऐकतांना मन प्रसन्न झाले. आदरणीय सीईओ साहेबांनी आपली तपासणी गणित या विषया पासून सुरुवात केली मुलांना गणितीय क्रियांचे आकलन कोठपर्यंत झाले आहे हे पाहण्या करीता मा. साहेबांनी पाढ्यांपासून सुरुवात केली आणि सर्वात शेवटच्या मुलाला नऊ चा पाढा म्हणावयास लावला. क्षणाचाही विलंब न लावता अगदी खडाखड त्या मुलाने कुठेही न अडखडता पाढा म्हणून दाखविला. नंतर साहेबांनी दहा, बारा, पंधरा, विसचे पाढे विचारले असता मुलांनी कुठेही न थांबता वा भांबावून न जाता गणितातली आपली चुणूक दाखविली. तद्नंतर साहेबांनी ईतिहास, भूगोल व सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले असता मुलांनी अपेक्षीत उत्तरे दिल्याने मा. साहेबांनी मुख्याध्यापक व शिक्षकांची वाहवा केली व शाळेविषयी समाधान व्यक्त केले व मुलांबरोबर येथील कर्तव्यतत्पर शिक्षकांचे सूद्धा कौतुक केले. तद्नंतर लागूनच असलेल्या अंगणवाडीला भेट देऊन अध्ययन व अध्यापन प्रकीयेला पोषक असलेल्या वातावरणात आल्याचा भास साहेबांना झाला.नंतर त्यांनी मुलांना देत असलेल्या पोषण आहाराची चव घेवून खुपच समाधान व्यक्त केले व एकंदरीत अंगणवाडीचे काम कौतुकास्पद असल्याचे मान्य करुन अंगणवाडी सेवीका सौ. छायाताई तायडे यांच्या कामाचे कौतुक करुन स्तुती केली. त्यानंतर मा. सी.ई.ओ.श्री. गुलाब खरात साहेब यांनी कार्यालयाची स्वच्छता, निटनेटकेपणा पाहून साहेब भारावून गेले. सर्व दस्त ऐवजांमध्ये वेळच्यावेळी घेतलेल्या नोंदी व अत्यंत आकर्षक व सुबक हस्ताक्षर पाहून मा. साहेबांनी मुख्याध्यापक श्री. रविंद्र मेहेंगे सरांचे व कर्मचारी वर्गाचे मनभरुन कौतुक केले.”जेव्हा एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तिच्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडते तेव्हा ईतिहास सुद्धा घडू शकतो” या वाक्याचे आवर्तनं आपोआपच जिभेवर घोळू लागली. शेवटी मा. साहेबांच्या एका आकस्मिक भेटीचा किती परिणाम घडू शकतो याचे जीवंत उदाहरण देता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *