वंचित बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीने तहसील कार्यालयास पिक भरपाई नुकसानी साठी निवेदन.

प्रतिनिधी जळगाव जामोद जळगांव जा. तालुक्यात मागील दोन दिवस सतंतधार अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. जुलै महीन्यातील पुराने तालुक्यातील शेतीचे कधीही न भरुन येणारे नुकसान केले. तिच भरपाई अजुन मिळाली नाही तुटक्या भरपाई साठी शेतक-यांना खेटे घ्यावे लागत आहे. ई के वाय सी यंत्रणा बंद पडली आहे. तर परत सुल्तानी संकटानंतर अस्मानी संकट येवुन ठाकले. हातातोंडाशी आलेला घास परवाच्या अवकाळी पावसाने हिरावला त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी , जळगांव जा. च्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना तालुकाध्यक्ष संतोष गवई , स्वप्नील गवई जि. सदस्य , देवाभाऊ दामोदर ता उपा , साहेबराव भगत ता उपा , श्रिकृष्ण गवई ता उपा , जगदीश हातेकर ता.अ. भबौमहा. प्रा. सुभाष सिरसाट सरचीटणीस , नारायण पारवे जेष्ठ नेते , अमोल तायडे , महादेव बोदडे , बाबुराव पवार सरपंच , श्रिराम भिडे इ पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *