तालुक्यातील पूर्णनदीपत्रातील अवैध रेती उपसा थांबविण्याची शिवसेनेचेची

प्रतिनिधी जळगांव (जामोद):दि.३० तालुक्यातील पुर्णा नदी पात्रातील अवैधरित्या केन व जेसीबी व्दारे अवैध रेती उपसा होत असून व त्यावर जळगांव जामोद येथील महसुल विभागाच्या आशीर्वाद आहे. जळगांव जामोद तालुक्यामध्ये पुर्णा नदी असून पुर्णा नदीला पाणी असल्याने रेतीमाफीया यांनी केन व जेसीबी व्दारे जळगांव जामोद तालुक्यातील १. गोळेगांव हुरसाळ, २. गोळेगांव पांडे जुने, ३. माहुली अ व ब .४. दादुलगांव या नदीपात्रातून दररोज १५ ते २० केन व जेसीबी व्दारे हजारो ब्रास अवैधरित्या रेतीचा उपसा चालू असून रेती माफीया दररोज लाखो रूपयाची कमाई करीत आहेत त्याबाबत मी अनेकवेळा जळगांव जामोद च्या तहसीलदार सौ. शितल सोलाट व उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना लेखी तकारी दिलेल्या आहेत. परंतू त्यांनी अदयापपर्यंत कुठल्याही रेती माफीयाविरूध्द ट्रॅक्टर किंवा टिप्परवर कारवाई केली नाही. तक्रारीमध्ये महसुलचे मंडळ अधिकारी व तलाठी व कोतवाल यांच्या आशिर्वादाने रेती माफीया है अवैधरित्या रेतीचा उपसा करीत आहेत. याबाबत तक्रार दिली होती. परंतू जळगांव जामोद च्याा तहसीलदार यांनी चौकशी करून कारवाई करण्याकरिता मंडळ अधिकारी यांना पत्र दिले . वास्तविक पाहता ज्यांच्या विरूध्द तकार केली, ज्यांच्या आशीर्वादाने अवैधरित्या रेती उपसा सुरू आहे. त्यांचेचकडे चौकशी करून कारवाईचे पत्र देणे हे एक प्रकारे रेती माफीयांना सहकार्य करण्यासारखे आहे. तालुक्यामध्ये अंदाजे ७५ते १०० टिप्पर व १०० ट्रॅक्टरव्दारे दररोज रेती उपसा करून रेती माफीया हे करोडपती होत आहेत. त्याकरिता वरिष्ठ् कर्तव्यदक्ष अधिका-यांमार्फत पथक तयार करून रात्री सायंकाळी ६ ते सकाळी ६ ते ७ वाजेपर्यत अवैध रेती वाहतुक सुरू असते. त्यांचेविरूध्द कड कार्यवाही करून रेती माफीयांविरूध्द मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. यापुर्वी देखील मी जळगांव जामोद व गोराडा बु मधील गिटटी खदानवरून अवैधरित्या मुरूमाची वाहतूक होत असल्याबाबत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना तकारी दिल्याहोत्या परंतू त्या विरूध्द कोणतीही कार्यवाही झाली नाही आणि आम्ही ६ ब्रासची तीन मोठे टिप्पर पकडून दिले व तहसिलदार मॅडम यांना आपण अवैधरित्या मुरूम आणणा-या विरूध्द कारवाई न केल्यास मी स्वतः पकडुन आपल्या ताब्यात देईल त्यानंतर तहसिलदार मॅडम यांनी स्वतः ६ ते ७ टिप्पर व १ ट्रॅक्टर पकडून त्यांचेकडून लाखो रूपयांचा दंड वसुल केला आहे. प्रत्येक वरील अवैधरित्या मुरूम व रेती माफीयाविरूध्द तकारी करून सूध्दा जळगांव जामोद तहसिलचे जबाबदार अधिकारी कार्यवाही का करत नाहीत, अवैधरित्या रेती माफीया व मुरूम यांच्यापासून त्यांना महीन्यापोटी लाखो रूपयांची कमाई आहे.त्यांच्या प्रॉपर्टीची सूध्दा सिआयडी मार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास कार्यवाही करावी व वरील पथक तहसिलदार दर्जाच्या अधिका-यामार्फत कारवाईचे आदेश देण्यात यावेत ही विनंती अशा आशयाचे निवेदन दि.३०ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत ही निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी संपर्कप्रमुख दत्ता पाटील, तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ यांचे सह उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे रमेश ताडे,युवा सेनेचे शुभम पाटील ,ईश्वर वाघ, अशोक टावरी, मुश्ताक भाईजान, कैलास राजपूत, महादेव लावरे ,भाईजान,चांद कुरेशी यांचेसह उबाठा शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांचे यावेळी उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *