
अकोट शहर पोलीसांच्या कारवाईत तीन जिवंत गोवंशासह आरोपी ताब्यात एकुण ९०,०००/- रु मुद्देमाल जप्त
अकोट
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट शहर पोलीस स्टेशनचे डी.बी.पथकाचे पोहेकॉ गणेश सोळंके यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून ईसम नामे सै.नजाकत अली से.अहेमद अली रा.खतीबपुरा अकोट याने त्याचे राहते घराचे पाठीमागे तीन गोवंश कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दतेने बांधुन ठेवले आहेत.अशा गोपनीय माहितीवरुन सदरची माहीती मा.पो.नि.किशोर जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह शिताफिने आरोपीच्या घराचे मागील बाजुस जावुन पाहणी केली असता दोन गायी व एक गोरा असे एकुण तीन गोवंश जनावरे एकुण किंमंत ९०.०००/- रु मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पञका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे.ही कार्यवाही मा.जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक,मा.अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी,उप.विभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.किशोर जुनघरे,डी.बी.पथकाचे पो.उपनि निलेश बारहाते,अंमलदार पोहेकॉ गणेश सोळंके,नापोकों विपुल सोळंके,पोकॉ मोहन दुर्गे,पोकॉ अश्विन चौव्हाण,पोकॉ अनिल वैराळे यांनी केली आहे.
