हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रामदेव जाजू यांचे निधन

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रामदेव जाजू यांचे निधन

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मालेगाव शहरातील मेडिकल क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व रामदेव जाजू (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने १३ आॅक्टोबर रोजी सकाळी दु:खद निधन झाले. त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, आई व मोठा आप्तपरिवार आहे. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने मालेगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. , मालेगाव येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी परिवार, नातेवाईक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *