
*मार्डी येथे आदिवासी शेतकरी,शेतमजूर व महिला बचत गटांची खाजगी फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली थांबवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोट यांना निवेदन
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट तालुक्यातील मौजे मार्डी येथील आम्ही रहिवासी असून आमचे गाव आदिवासी बहुल आहे.गावातील बहुसंख्य कुटुंबे शेतकरी,शेतमजूर व महिला बचत गटावर अवलंबून आहेत.सद्यस्थितीत पावसाअभावी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न नाही व शेतमजुरांना रोजगार नाही.रोजगाराअभावी गावातील अनेक शेतमजूर कुटुंबांसह उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी कामाकरिता स्थलांतरित करत आहेत.अशा बिकट परिस्थितीत खाजगी फायनान्स कंपन्या व स्मॉल फायनान्स संस्थांकडून महिला बचत गट,शेतमजूर व शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी घरी येऊन दबाव,दमदाटी व अपमान करणे सुरू आहे.तरी ती सक्तीची वसुली ताबडतोब थांबवावी.या बाबत सहायक निबंधक अकोट यांना निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदन हे शाम गावंडे यांच्या नेतृत्वात,तसेच आ.नितीन बापू देशमुख,मा.आ.संजय गावंडे,गोपाल दातकर,मुकेश मुरूमकार,दिलीप बोचे सुभाष सुरत्नेआणि,यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.निवेदन देतेवेळी अर्चना सुरेश सुरत्ने,माधुरी शेषराव सोलकर,रिना मेघनाथ सुरत्ने,निलु शिवदास महल्ले,सुमित्रा दादाराव सुरतने,ईमलाबाई दादाराव सुरतने,अश्विनी अक्षय सुरतने,सुमित्रा पंजाबराव पालवे,निशा शंकर मोरे,सरीता हरिदास पालवे,नेहा इंद्राजीत महल्ले,वंदना शिवा सूरतने,यांची उपस्थिती होती.*आमच्या मागण्या*१. दुष्काळ संपेपर्यंत सर्व खाजगी फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवावी.२. बाहेरगावी स्थलांतरित शेतमजुरांच्या कुटुंबियांना त्रास देणे थांबवावे.३. नियमबाह्य वसुली करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी.४. शासनाच्या दुष्काळी सवलतीची माहिती गावात द्यावी.
