दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी मदत टाका:- अक्षय पाटील

दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी मदत टाका:- अक्षय पाटील

जळगाव (जा.) :-

यावर्षी राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे जमतेम 80 दिवसाचा पाण्याचा खंड पडल्याने शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन,कापूस,तूर व इतर पिके पूर्णतः निस्तनाभूत झाले.राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय पथकाने थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन दुष्काळी पाहणी दौरे केले. त्यानंतर राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला मात्र अजूनही कोणतीच आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही.ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजुरांची अनेक मुले आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई,पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या घरी मुला मुलींचे लग्न,दवाखाने किंवा इतर आव्हाने आहेत ते शेतकरी प्रचंड चिंतेत पडल्याचे दिसत आहेत.शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी जळगाव जामोद तालुक्यामध्ये युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केली. तसेच महाराष्ट्रामधील शेतकरी खूप मोठा आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत आहे मात्र सरकारकडून अजूनही शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत देण्यात आली नाही.तरी सरकारने शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरीव आर्थिक मदत जमा करावी अशी मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी केली. जर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अक्षय पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *