दुःखद वार्ता! आंबेडकरी चळवळीचा निर्भीड आवाज हरपला; मिलिंद कीर्ती यांचे अपघाती निधन

दुःखद वार्ता! आंबेडकरी चळवळीचा निर्भीड आवाज हरपला; मिलिंद कीर्ती यांचे अपघाती निधन

ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर तायडे :

आंबेडकरी विचारविश्वातील विचारवंत, लेखक आणि निर्भीड पत्रकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मिलिंद कीर्ती यांचे काल रात्री नागपूर येथे झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने आंबेडकरी चळवळीसह साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.मिलिंद कीर्ती हे केवळ विचारवंत आणि लेखक नव्हते, तर सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणारे पत्रकार म्हणूनही परिचित होते. आंबेडकरी विचारधारा, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांशी त्यांची वैचारिक बांधिलकी होती. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू, निर्भीड आणि वैचारिक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याची उणीव दीर्घकाळ जाणवत राहील.“मिलिंद कीर्ती यांच्या निधनाने आंबेडकरी विचारविश्वातील एक महत्त्वाचा आवाज हरपला आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. आमचे स्नेही मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांवर आणि आप्तस्वकीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली! विनम्र अभिवादन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *