
अकोट येथे १४ ऑक्टोबरला महसूल लोकअदालत
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
महसूल न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले दावे व अपील तडजोडीने निकाली काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियानांतर्गत १४ ऑक्टोबर रोजी अकोट येथील पोपटखेड मार्गावरील प्रशासकीय इमारतीत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.उपविभागीय महसूल अधिकारी मनोज लोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली गठित पॅनलमध्ये तहसीलदार डॉ.सुनील चव्हाण,तहसीलदार महेश रामगुंडे,समाजसेवक विजय जितकर व अधिवक्ता जयकृष्ण गावंडे यांचा समावेश आहे.महसूलविषयक प्रलंबित दावे व अपीलांचा तडजोडीने निपटारा करून नागरिकांचा वेळ,पैसा व श्रम वाचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.या अभियानाचा दुसरा टप्पा १६ डिसेंबर रोजी होणार आहे. प्रलंबित प्रकरणांतील शेतकरी,नागरिक व वकिलांनी लोकअदालतीत सहभागी व्हावे असे आवाहन मनोज लोणारकर यांनी केले आहे.
