
संदीप भुस्कट मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानीत
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट येथील युवा प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व संदीप मधुकरराव भुस्कट हे असे व्यक्तिमत्व आहे की चांगले कार्य कुठलेही असो ते त्यात तन मन आणि धनाने कार्य करण्यासाठी सतत पुढे येतात.वयाच्या १९ व्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी फुले दांपत्याचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी फुले ब्रिगेड ही संस्था स्थापन केली.त्या मार्फत वेळोवेळी समाजोपयोगी कार्य केले जसे नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करणे,ठीक ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे,रक्तगट तपासणी शिबिर,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,वृक्षारोपण,आरोग्य तपासणी शिबिर असे अनेक कार्य वेळोवेळी करतात.विद्यार्थी दशेपासूनच वाचन व लेखनाची आवड त्यातूनच नेतृत्व गुण विकसित होत होते.कॉलेज मध्ये असताना महाराष्ट्रातील फार्मसी विद्यार्थ्यांचे संघटन ऑल महाराष्ट्र फार्मा स्टूडेंट सोसायटीचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले.फॉर्मसी विद्यार्थ्यांचा मोर्चा नागपूर येथील विधानसभा वर काढून यशस्वी नेतृत्व केले.माळी महासंघाचे सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद ते भूषवित असून सहकार क्षेत्रात सुधा ते क्रांतिसूर्य सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.२००२ मध्ये त्यांना राज्यस्तरीय माळी युवा भूषण पुरस्कार मिळाला असून
त्यांचे पत्नी डॉ.किरण भूस्कट या रिद्धी क्लिनिकचे संचालिका असून त्यांनाही सावित्रीची लेक हा पुरस्कार मिळाला आहे.संदीप भुस्कट यांनी विविध न्यूजपेपर मधे लेख सुद्धा प्रकाशित केले आहेत.जे सी आय या अंतर्राष्ट्रीय संघटने मधे सुधा १४ वर्षापासून विविध पदांवर काम करून अनेक समाजोपयोगी कामे केली.रक्तदान हा त्यांचा आवडता समाजोपयोगी प्रकल्प ते वेळोवेळी अनेक संघटने मार्फत राबवत असतात.शेती क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी आहे.टरबूज,केळी,निंब,कपाशी,तूर सोयाबीन विशेषत हळद असे अनेक दर्जेदार पिकांचे उत्पादन उच्चशिक्षित असून सुद्धा घेतात.त्यांनी लोकांना उच्च दराची हळद पावडर मिळावी म्हणू रिद्धी हळद पावडरचे माध्यमातून हळद उद्योगातही पाऊल ठेवले आहे.कृषी संस्कृतीशी आपली नाळ जोपासतात.संदीप भुस्कट हे बॅचलर ऑफ फार्मसी असून मार्केटिंग मध्ये एम बी ये आहेत.भूस्कट मेडिकलचे ते संचालक आहेत.सध्या रोटरी क्लब ऑफ अकोट व्हिजनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून
नुकताच अकोटचा रामेश्वर स्मशानभूमी साठी त्यांनी अनेक रोटरी सदस्यांचे मदतीने ४१००० हजार रुपयांची साउंड सिस्टम उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका घेतली.जवळपास ५३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.तसेच अनेक जणांची डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा मोफत करून देण्यात त्यांचा रोटरी क्लब ऑफ अकोट व्हिजन कडून राबण्याचा प्रयत्न असतो.नुकताच अकोट येथील ग्रामदैवत श्री नरसिंग महाराज यांचे नाव नगर पालिका अकोटचे मुख्य प्रवेश द्वारास द्यावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले असून २०१६ पासून ते यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सोबत घेऊन ही मागणी लाऊन धरत होते.सहकारी बदलत गेले परांतू त्यांनी प्रयत्न सोडले नाही.अश्या व्यक्तीस त्यांनी मराठवाडा येथे महात्मा फुले यांच्या विचार पोहोचविण्यासाठी जे भरीव कार्य केले त्यासाठी त्यांना मराठवाडा रत्न पुरस्कार हॉटेल ट्रीट इंपिरियल छत्रपती संभाजी नगर येथे काल ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे हस्ते विविध मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला,त्यांचे हातून असेच समाजोपयोगी कार्य होत राहो ही सदिच्छा.
