वाशिम जिल्ह्यात अखिल भारतीय कैकाडी महासंघ विदर्भ विभागातर्फे जाधव परिवाराचा सुवर्णक्षण

वाशिम जिल्ह्यात अखिल भारतीय कैकाडी महासंघ विदर्भ विभागातर्फे जाधव परिवाराचा सुवर्णक्षण श्री ज्ञानेश्वर भाऊ जाधव विदर्भ अध्यक्ष आणि सौ उषाताई अनिल जाधव महिला राज्य उपाध्यक्ष जंगी सत्कार, तर श्री अनिलभाऊं जाधव कारंजा, राज्य उपाध्यक्ष वाढदिवस उत्साहात साजरा!

वाशिम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)

वाशिम जिल्ह्यामध्ये आज सामाजिक क्षेत्रातील एक अभूतपूर्व आणि आनंदाचा सोहळा पार पडला. आज दिनांक २९ ऑक्टोबर रोजी वाशिम येथे विदर्भ अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरभाऊ जाधव आणि आमाणी येथे राज्य उपाध्यक्ष सौ. उषाताई अनिल जाधव यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या दुग्धशर्करा योगासोबतच, राज्य उपाध्यक्ष श्री अनिलभाऊ जाधव यांचा वाढदिवस अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला. एकाच दिवशी जाधव परिवारातील या तीन प्रमुख नेतृत्वांचा गौरव आणि वाढदिवस साजरा झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.वाशिम येथे विदर्भ अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरभाऊ जाधव यांचा सन्मान वाशिम येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे राज्य सरचिटणीस श्री किसनराव जाधव आणि राज्य उपाध्यक्ष श्री अनिल भाऊ जाधव सोबत रवी गायकवाड महासंघ सदस्य यांनी सोहळ्यात विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ जाधव यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वरभाऊंनी आजवर महासंघाच्या माध्यमातून विदर्भातील तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडले असून, त्यांच्या याच अविरत कार्याची पावती म्हणून हा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना ज्ञानेश्वरभाऊंनी, “हा सत्कार माझा नसून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.आमाणी येथे राज्य उपाध्यक्ष सौ. उषाताई जाधव यांचा गौरव दुसरीकडे, आमाणी येथे महिला सक्षमीकरणाचा आणि कर्तृत्वाचा आदर करणारा सोहळा रंगला. राज्य उपाध्यक्ष सौ. उषाताई जाधव यांचा त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. महिलांचे संघटन आणि समाजकार्यात त्यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत.श्री अनिलभाऊ जाधव यांच्या वाढदिवसाचा वाढला उत्साह या सत्कार सोहळ्यांना अधिकच आनंदाची जोड मिळाली ती म्हणजे राज्य उपाध्यक्ष अनिलभाऊ जाधव यांच्या वाढदिवसाची. कार्यकर्त्यांनी अनिलभाऊंचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून आणि केक कापून साजरा केला. अनिलभाऊंच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम आणि आमाणी दोन्ही ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलाऊर्जस्विनी आणि प्रेरणेचा सोहळा हा संपूर्ण दिवस जाधव परिवाराच्या सामाजिक बांधिलकीची आणि नेतृत्वाची प्रचिती देणारा ठरला. एका बाजूला विदर्भाच्या नेतृत्वाचा गौरव, दुसऱ्या बाजूला महिला शक्तीचा सन्मान आणि सोबतीला खंबीर अशा युवा नेतृत्वाची वर्षपूर्ती, असा हा त्रिवेणी संगम होता.
या तिन्ही नेतृत्वांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि भावी कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा, देऊन अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *