
श्री महारुद्र हायस्कुल सावरा येथे सुरक्षीत बचपन अभियान कार्यक्रम
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यातील श्री महारुद्र हायस्कूल सावरा येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत माननीय सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित बचपन अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.सदर कार्यक्रमात बालकांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श,बालकांचे हक्क व अधिकार,वैयक्तिक सुरक्षितता तसेच चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या महत्त्वपूर्ण विषयांवर बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्या च्या माहिती बरोबरच पालक आणि बालकांमध्ये विश्वासाचे,प्रेमाचे व मोकळ्या संवादाचे नाते असणे अत्यंत आवश्यक आहे.याच उद्देशाने पालक आणि बालक यांच्यातील संवादाचे महत्त्व विविध कृतींच्या माध्यमातून प्रभावीपणे स्पष्ट करता येऊ शकतो
तसेच अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे,असुरक्षित परिस्थिती ओळखणे,चुकीच्या स्पर्शाला ठामपणे नकार देणे,गरज पडल्यास मोठ्याने मदतीसाठी आवाज देणे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास विश्वासू व्यक्तीला त्वरित सांगणे याबाबत बालकांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.शासकीय यंत्रणा तसेच योजना याची देखील माहिती देऊ शकतो.विशेष म्हणजे या कार्यक्रमात बालकांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन विविध कृती व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्वतःचे बालपण सुरक्षित कसे ठेवावे.या बाबत माहिती ऍड देशपांडे मॅडम,गजानन राऊत सहाय्यक संरक्षण अधिकारी कार्यलय अकोट तसेच अँड प्रफुल भारसाकळे सौ.जोशी मॅडम सगुदेशक विधी विभाग यांनी आपले विचार मांडले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नितिन सपकाळ होते.यावेळी कार्यक्रमाचे संचालन सौ.टापरे मॅडम तर आभार विजय पाथरीकर यांनी मानले.तसेच या पुर्वी सदर कार्यक्रम वसुंधरा स्कुल अकोट श्री नागास्वामी इंग्लिश स्कूल बोर्डी येथे घेन्यात आले.यावेळी वसुंधरा स्कूलचे मुख्याध्यापक नारे सर तसेच नकाशा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सुरेश गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.सदर कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत तालुका विधी सेवा प्राधिकरण अकोट व जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत संरक्षण अधिकारी कार्यालय अकोट यांच्या समन्वयाने कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.सुरक्षित बालपण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे; आणि ते सुरक्षित ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
