महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वाशिममध्ये धम्मकाया मिशनचे बौद्ध धर्म संमेलन उपासिका संघाच्या पुनरुज्जीवनासह पाच कोटी प्रचारक निर्मितीतर होणार

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वाशिममध्ये धम्मकाया मिशनचे बौद्ध धर्म संमेलन उपासिका संघाच्या पुनरुज्जीवनासह पाच कोटी प्रचारक निर्मितीतर होणार मंथन जिल्ह्यात बौद्ध उपासिका संघाचा पहिलाच व्यापक प्रयास

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

महाबोधी महाविहारासह इतर विहारांच्या मुक्तीं आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी धम्मकाया मिशनच्या वतीने वाशिममध्ये बौद्ध धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजता विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे हे संमेलन होणार आहे. त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपासिका संघाच्या अध्यक्ष सवीता गौतम शेजूळ यांनी केले आहे.या संमेलनात महाबोधी महाविहार मुक्तीं आंदोलन, धम्मप्रचारकांची निर्मिती आणि उपासिका संघाचे पुनरुज्जीवन या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात येणार आहे. महाबोधी महाविहार मुक्तींचा प्रश्न केवळ धार्मिक नसून तो बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.चौकट…सविस्तर उदबोधन व मान्यवरांचे मार्गदर्शन
बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारामध्ये धम्म प्रचारकांची भूमिका या विषयावर डॉ. सुजित बोधी मार्गदर्शन करणार आहेत, संमेलनाचा दुसरा विषय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी पाच करोड प्रचारकांची निर्मिती या विषयावर धम्मकाया मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष उपासक ॲड.प्रवीण पंडित मार्गदर्शन करणार आहेत, तसेच उपासिका संघाचे पुनरुजीवन या विषयावर धम्मकाया मिशनच्या उपासिका संघाच्या राष्ट्रीय संयोजिका उपासिका ॲड.माधुरी भालेराव मार्गदर्शन करणार आहेत या संमेलनात इत्यादी सविस्तर विषयांवर मंथन होणार असून महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न केवळ धार्मिक नसून तो बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धम्मकाया मिशनचे विदर्भ विभाग प्रमुख उपासक शैलेश कापसे असणार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपासक प्रताप नवघरे, सूत्रसंचालन उपासिका सविता शेजुल व स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपासक गजानन उमाळे तसेच आभार प्रदर्शन उपासक राहुल तायडे हे करणार आहेत.


या संमेलनाला धम्मकाया मिशनची केंद्रीय कार्यकारिणी व राज्याध्यक्ष उपासक सचिन गायकवाड व उपासिका शीतल सावळे तसेच विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि बौद्ध चळवळीतील मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार इ. उपस्थित राहणार आहेत.
आंदोलनासाठी व्यापक जनाधार संघटनात्मक बळ आणि आर्थिक पाठबळ उभारण्याच्या दृष्टीने संमेलनातून महत्त्वपूर्ण दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *