
केळीवेळी येथे अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई १० हजार ७५० रुपयांची देशी दारू जप्त,दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
केळीवेळी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात दहीहंडा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २१५ नग देशी दारूचे क्वॉर्टर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत १० हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्टच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.बसस्थानक परिसरात पहिली कारवाई पहिल्या कारवाईत अरुण नारायण भटकर (वय ५५ रा. केळीवेळी याच्यावर कारवाई करण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे ग्राम केळीवेळी येथील बसस्थानक परिसरात पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ९० एम.एल. क्षमतेचे १२५ देशी दारूचे क्वॉर्टर आढळून आले.या दारूची किंमत ६ हजार २५० रुपये असून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.दुसऱ्या कारवाईत ९० क्वॉर्टर जप्त दुसऱ्या स्वतंत्र कारवाईत किशोर विठ्ठल कानपूरे (वय २९, रा. केळीवेळी, ता. अकोट) याच्याकडून ९० एम.एल. क्षमतेचे ९० देशी दारूचे क्वॉर्टर जप्त करण्यात आले. जप्त दारूची किंमत ४ हजार ५०० रुपये आहे.दोघांविरुद्ध गुन्हे दाखल या दोन्ही प्रकरणांमध्ये दहीहंडा पोलीस ठाण्यात अनुक्रमे अप. क्र. ४६२/२०२६ आणि ४६३/२०२६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त दारूचे नमुने पुढील सी.ए. तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून, दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.ही कारवाई दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी पोहवा सतीश वानखडे (ब.नं. ४२२) तसेच तपास अधिकारी पोहवा रविराज डाबेराव (ब.नं. १९१९) यांच्या पथकाने केली.धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केळीवेळी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन परिसरातील गैरप्रकारांना आळा बसावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
