शेलगांव ओंकारगिर येथे नवनाथ‌ ग्रंथाची सांगता, (बबन गोरे यांच्या वतीने नगर भोजन)

शेलगांव ओंकारगिर येथे नवनाथ‌ ग्रंथाची सांगता, (बबन गोरे यांच्या वतीने नगर भोजन)

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,१ :-मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोदांडे येथील ओंकारगिर बाबाच्या संस्थानवर मागील एक महिन्यापासून श्रावण महिन्यात नवनाथांच्या ग्रंथाचे वाचन रोज सायंकाळी ८ ते ९ वाजता भागवत ( दुकानदार)वाझुळकर आणि साईराम वाझुळकर हे करत असत,या करिता महीला सह गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असत, गावातील मागील तीन वर्षापासून ओमकारगिर बाबा चे भगत बबन नामदेवराव गोरे यांच्या वतीने नवनाथाच्या ग्रंथाचे आयोजन व महाप्रसादाचा वाटप करत आहेत, आज दिनांक 13 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी संस्थांवर बाबाची पूजा आरती करून या नवनाथ ग्रंथाचे सांगता करण्यात आली तसेच नगर भोजनाचा कार्यक्रम बबन गोरे यांच्या वतीने करण्यात आला दर्शनाचा व महाप्रसादाला भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला या प्रसंगी गावातील नागरिकांनी सहकार्य केले, महाप्रसाद लाभ गावकऱ्यासह राम विजय जाधव युवा भाजपा कार्यकर्ते, विवेक गवळी शिवसेना ओबीसी सेलचे उपजिल्हाप्रमुख, अनिल जाधव सामाजिक कार्यकर्ते अमानी, धनंजय गवळी, सरपंच शेषराव गोटे, यांच्यासह मित्रमंडळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *