
वनवासी बांधवांनी लोकसंस्कृती व लोककलेचे दर्शन घडवीले.नृत्यरंग वनवासियांचा जेसीआय अकोटचे आयोजन.
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
जेसीआय अकोटच्या वतीने दिनांक ९ ते १५ सप्टेंबर दरम्यान जेसी सप्ताह साजरा केल्या जात आहे. यामध्ये सात दिवस विविध समाज उपयोगी, प्रबोधनात्मक, विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यापैकीच एक अभिनव कार्यक्रम “नृत्यरंग वनवासियांचा” जेसीआयच्या वतीने शनिवार दिनांक १२ सप्टेंबरला बिलबिले मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित केला होता.वनवासीयांचे महत्त्व ओळखून त्यांची संस्कृती त्यांच्या कलेची ओळख शहरवासीयांना व्हावी या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला होता.भीली, चिपि,वस्तापूर, मेनघाट, बोरव्हा,पांढरखेळ, खीरकुंड, जनुना समवेत विभिन्न गावातील २५० पेक्षा जास्त वनवासी महिला व पुरुषांनी यामध्ये आपला सहभाग दर्शविला. चचेरी,दंडा, गदली सुसून,होरीयाल अश्या विभिन्न प्रस्तुती द्वारे उपस्थित वनवासी बांधवांनी लोकसंस्कृती व लोककलेचे प्रदर्शन घडवीत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत सचिव भास्कररावजी रोकडे होते. याप्रसंगी व्यासपीठावर एकलव्य छात्रावास समितीचे सचिव गोपाल गांधी,पूर्वाध्यक्ष आनंद भोरे, झोन ऑफिसर अतुल भिरडे, अंचल उपाध्यक्ष डॉ.कृष्णन बजाज, सप्ताह प्रमुख संदीप चांडक प्रकल्प प्रमुख विवेक गणोरकर तथा कार्यकारी सचिव म्हणून रुद्रम झाडे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला जेसी परिवार समवेत शहरवासीयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गोपाल गांधी यांनी केले तर जितेंद्रजी चावडा यांनी विशेष भूमिका पार पाडली.
