
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती दत्ता भांदुर्गेमुंगळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समितीचे पुनर्गठन
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव):
तालुक्यातील मुंगळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे आज रोजी पुनर्गठन करण्यात आले. सदस्य निवडीनंतर अध्यक्षपदी सौ. स्वाती दत्ता भांदुर्गे, तर उपाध्यक्षपदी श्री. पवन लक्ष्मण राजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.समितीच्या सदस्यपदी श्री. संतोष विठ्ठल भांदुर्गे, सौ. सागर गणेश आघाव, सौ. वैशाली स्वप्नील वानखडे, श्री. योगेश किसन राऊत, सौ. निर्मला दिलीप शेळके, सौ. शालिनी शिवाजी भांदुर्गे, श्री. धनंजय विठ्ठल बकाल, सौ. कावेरी पंकज डोंगरे व श्री. महादेव आनंदा पवार यांची निवड झाली.यावेळी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे पालक, मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंदाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी नूतन समितीने शाळा व गावकरी यांच्यात योग्य समन्वय साधून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.मागील शाळा व्यवस्थापन समितीने दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्याध्यापक श्री. रवी टाले यांनी आभार व्यक्त केले. तसेच नवनियुक्त समितीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.चौकट :नवनियुक्त अध्यक्ष सौ. स्वाती दत्ता भांदुर्गे यांनी मनोगत व्यक्त करताना, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पालक, शिक्षक व ग्रामस्थांना सोबत घेऊन काम करू. शाळेच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे सांगितले.
