निमगाव फाटा येथे LCB ची मोठी कारवाई गावठी कट्ट्यासह दोन आरोपी जेरबंद, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

निमगाव फाटा येथे LCB ची मोठी कारवाई; गावठी कट्ट्यासह दोन आरोपी जेरबंद, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

नांदुरा तालुका प्रतिनिधी संदेश पहुरकर

नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव फाटा परिसरातील हॉटेल माऊली बार अँड रेस्टॉरंट येथे स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या पथकाने धाडसी कारवाई करत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत गावठी कट्टा, मॅगझीन, दुचाकी व मोबाईल फोन असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१६ वाजताच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निमगाव फाटा येथील हॉटेल माऊली बार अँड रेस्टॉरंट परिसरात छापा टाकला. यावेळी आरोपी रविंद्र विठ्ठल वेरुळकर (वय २९, रा. येरळी, ता. नांदुरा) याच्या ताब्यातून विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा व मॅगझीन आढळून आले.कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, ५ हजार रुपये किमतीची मॅगझीन, ३० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र. MH-28-CA-7627) तसेच १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला.या प्रकरणी रविंद्र विठ्ठल वेरुळकर व पवन कौतुकराव वेरुळकर (वय ३०, रा. येरळी, ता. नांदुरा) यांच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७६/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२३, १३५ व भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोउपनि थुल करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *