वाई दिवठाणा गट ग्रामपंचायत येथे आर ओ फिल्टर प्रणालीचे लोकार्पण संपन्न

वाई दिवठाणा गट ग्रामपंचायत येथे आर ओ फिल्टर प्रणालीचे लोकार्पण संपन्न

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

तालुक्यातील वाई दिवठाणा गट ग्रामपंचायत दिवठाणा हद्दीत १० लाख रुपये खर्चाच्या शुद्ध पेयजल आरओ फिल्टर प्रणालीचे लोकार्पण सोहळा मा.कुणाल राजकुमार खंडेराय यांच्या विशेष प्रयत्नातून संपन्न झाला.या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन सरपंच मा.मायाताई राजुभाऊ शेंडे यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आले.यावेळी उपसरपंच मा.कविताताई भास्कर वालशिंगे,ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आरओ फिल्टरमुळे गावातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार असल्याने नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.रोगराईचे प्रमाण वाढल्याने वाई दिवठाणा गट ग्रामपंचायतने घेतलेला निर्णय व सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *