सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार इंजि.सचिन तायडे यांना जाहीरउत्कृष्ट तांत्रिक व प्रशासकीय सेवेची महाराष्ट्र शासनाकडून दखल

सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार इंजि.सचिन तायडे यांना जाहीरउत्कृष्ट तांत्रिक व प्रशासकीय सेवेची महाराष्ट्र शासनाकडून दखल

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार सन २०२५-२०२६ या कालावधीसा’ी जाहीर झाला आहे. यामध्ये तांत्रिक संवर्गातील (स्थापत्य) सहायक अभियंता श्रेणी-१ सचिन निवृत्ती तायडे यांना हा वैयक्तिक सन्मान जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिकृत शासन निर्णयानुसार या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात रस्ते, पुल, विविध शासकीय इमारती आणि इतर पायाभूत सुविधांची बांधकामे राबवली जातात. ही कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संगणकीय संकल्पनाचित्रे, विद्युतीकरण आणि क्लिष्ट तांत्रिक कौशल्ये पणाला लावून प्रकल्प वेळेत व दर्जेदाररीत्या पूर्ण करणार्‍या अधिकार्‍यांचा गौरव शासनामार्फत केला जातो.भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १५ सप्टेंबर या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी ‘अभियंता दिन’ साजरा केला जातो. या दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील निवडक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवले जाते.मलकापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-१ सचिन निवृत्ती तायडे यांनी आपल्या कार्यकाळात दाखवलेले उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, प्रशासकीय पकड आणि कर्तव्यनिष्ठा यांमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी शेत रस्त्यांच्या कामांसह राबविलेल्या विविध दखलपात्र कामांमुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली असून, त्यांच्या या सेवेची दखल शासनाने घेतली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सचिन तायडे यांना राज्यस्तरीय सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी-कर्मचारी आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.केलेली उल्लेखनीय कामे – कार्यकाळात अनेक शेत रस्त्याची कामे पूर्णत्वास गेली,शेत रस्त्यांच्या कामाचें योग्य नियोजन करून अनेक वर्षापासून शेत रस्त्यान अभावी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा.- शेत रस्त्यांची कामे अधिकाऱ्यांच्या दृष्टीने किचकट व वेळ खाऊ असल्याने टाळाटाळ करतात परंतु इंजि. तायडे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची सेवा समजून शेत रस्त्यांची कामे मार्गी लावली व अनेक कामे प्रगती मध्ये असून प्रास्ताविक सुद्धा आहे.- अनेक गावे रस्ते व पुलांअभावी एकमेकांना जोडलेली नव्हती ती जोडल्या गेली.- कार्यक्षेत्रामध्ये अनेक इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून काही इमारती प्रगतीत सुद्धा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *