अकोट पालिकेच्या प्रवेशद्वार व सभागृहाला महापुरुषांची नावे नगराध्यक्षा सौ.माया धुळे यांच्या पुढाकाराने प्रस्ताव मंजूर

अकोट पालिकेच्या प्रवेशद्वार व सभागृहाला महापुरुषांची नावे नगराध्यक्षा सौ.माया धुळे यांच्या पुढाकाराने प्रस्ताव मंजूर

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट नगरपालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार आणि मुख्य सभागृहाच्या नामकरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.नगराध्यक्षा सौ.माया धुळे यांनी या प्रकरणात विशेष पुढाकार घेत नागरिकांच्या आणि सामाजिक संघटनांच्या भावनांचा आदर केला. सभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देत मुख्य प्रवेशद्वाराला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार दुसऱ्या प्रवेशद्वाराला श्री नरसिंग महाराज प्रवेशद्वार तसेच मुख्य सभागृहाला ‘फुले-शाहू-आंबेडकर सभागृह’ असे नामकरण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.नगरपालिकेच्या नव्या वास्तूला ऐतिहासिक,आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांची नावे देण्यात यावीत अशी मागणी नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती.नगराध्यक्षा सौ.माया धुळे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत हा विषय सर्वसाधारण सभेच्या पटलावर आणला आणि त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणली.नगराध्यक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि उत्कृष्ट समन्वयामुळे चर्चेनंतर सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेचा, श्री नरसिंग महाराजांच्या आध्यात्मिक कार्याचा तसेच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा गौरव होणार असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली.नगराध्यक्ष माया धुळे यांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद पुढाकारामुळे नगरपालिकेच्या या निर्णयाचे संपूर्ण अकोट शहरातून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.नव्या वास्तूला लाभलेल्या या महापुरुषांच्या नावांमुळे पालिकेला एक नवीन ऐतिहासिक व सामाजिक ओळख प्राप्त झाली असे मत स्थानिक नगरसेवक स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *