अखील भारतीय स्तरावरील तबला स्पर्धेत पवन चिंचोळकर यांचा द्वितीय क्रमांक

अखील भारतीय स्तरावरील तबला स्पर्धेत पवन चिंचोळकर यांचा द्वितीय क्रमांक

देवानंद खिरकरअकोला जिल्हा प्रतिनिधी

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथील बी.ए.भाग 2 संगीतचा विद्यार्थी पवन चिंचोळकर याने उस्ताद लड्डू मियाँ खान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अखिल भारतीय स्तरावरील तबला वादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.ही प्रतिष्ठित एकल तबला वादन स्पर्धा लड्डू मिया खान साहब प्रतिष्ठान व महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय,अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.देशभरातून अनेक गुणवंत तबलावादकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.त्यामध्ये पवन चिंचोळकर यांनी आपल्या उत्कृष्ट तबलावादनातून परीक्षकांची मने जिंकत द्वितीय क्रमांकासह ९,००० रोख पारितोषिक मिळविले.आपल्या यशाचे श्रेय गुरुवर्य ॲड.चैतन्य देशपांडे आई-वडील आणि आपल्या गुरुजनांना दिले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पांडे तसेच संगीत विभाग प्रमुख डॉ.प्रतिभा पवित्रकार,डॉ.उत्तरा तडवी,डॉ.मृणाल कडू,डॉ.संतोष वावगे यांनी अभिनंदन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल संगीत क्षेत्रातून तसेच मित्रपरिवार व आप्तेष्टांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *