
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांची दिवाळी अंधारात घालवू,प्रशांत डिक्कर हिगाव येथे स्वराज्य पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोटकष्टाचा घाम गाळूनही संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवरून ‘स्वराज्य’ संघटना आक्रमक झाली आहे.छत्रपती संभाजीराजे यांच्या सूचनेनुसार,तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे आयोजित युवकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अकोला जिल्ह्यात स्वराज विस्ताराचा श्रीगणेश करण्यात आला.या बैठकीला स्वराज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, “अहोरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी सरकारने अंधारात ढकलली आहे.जर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली नाही, तर सत्ताधाऱ्यांची दिवाळीही अंधारात घालवल्याशिवाय स्वराज्य शांत बसणार नाही.बैठकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, थकीत पीक विमा मिळणे, दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणे, कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा करणे आणि मायक्रो फायनान्स व पतसंस्थांच्या कर्जवसुलीस स्थगिती देणे यांसारख्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.या मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन उभारण्याची दिशा यावेळी निश्चित करण्यात आली.या बैठकीस तेल्हारा तालुक्यातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.तालुका कार्यकारिणी निवडीसोबतच अनेक तरुणांनी स्वराज्य संघटनेत प्रवेश केला.या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य मित्र मंडळ, दहिगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आशिष शेळके, प्रविण पोटे, प्रज्वल बुरघाटे, पवन खुमकर, अंकुश बुरघाटे, कुलदीप बाजारे,श्याम गावंडे,शिवम ईसापुरे, स्वप्निल भारसाकडे, सह बहुसंख्य स्वराज्य चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
