
दिवाळीबेन सेदाणी शाळेसमोर तातडीने गतिरोधक बसवा,समाजसेवक विजय जितकर पोपटखेड मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट ते पोपटखेड मार्गाची दुरावस्था ही अत्यंत खराब झाली असून या मार्गांवर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून स्व.दिवाळीबेन सेदाणी इंग्लिश स्कूलसमोर तातडीने ‘गतिरोधक’बसाविण्याची गरज निर्माण झाली आहे.अशी आग्रही मागणी समाजसेवक विजय धोंडूजी जितकर यांनी व्यक्त केली आहे.पोपटखेड मार्गांवर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून या मार्गाची अकोटच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दुरुस्ती किंवा नूतनीकरण करावे असे मागणी निवेदनाद्वरे करण्यात आली आहे.स्व.दिवाळीबेन सेदाणी इंग्लिश स्कूलसमोर गत अनेक वर्षांपासून गतिरोधक नसल्यामुळे अनेक लहानमोठे अपघात घडल्याचे सांगितले जाते.त्या शिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाला धोकाही निर्माण झाला आहे.या शाळेच्या व्यवस्थापनाकडून या गतिरोधकाची अनेकदा मागणीही करण्यात आली.परंतू नेत्यांकडून मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता सुद्धा अद्याप झाली नाही.जर येथे गतीरोधक बसविण्यात आले नाही तर अखेर नागरिकांना आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही,असे मत समाजसेवक विजय जितकर यांनी व्यक्त केले आहे.तरी संभधित विभागाने ताबडतोब दखल घ्यावी व दिवाळी अगोदर येथे गतिरोधक बसविण्यात यावे.
