
अकोट तालुक्यातील कोतवाल भरतीचे गावनिहाय आरक्षण जाहीर. अकोट तालुक्यातील रिक्त असलेल्या कोतवाल ( महसूल सेवक)
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
संवर्गातील एकूण १९ जागा भरतीची गावनिहाय आरक्षण सोडत दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय इमारत पोपटखेड रोड, अकोट येथे सकाळी ११ वाजता काढण्यात आली असून कोतवाल भरती आरक्षण सोडती नंतर काढण्यात आलेले सामाजिक प्रवर्गनिहाय आरक्षण व महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.कोतवाल भरती सन २०२६ गाव निहाय आरक्षणा बाबत दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी कोतवाल भरती आरक्षण सोडती नंतर काढण्यात आलेले सामाजिक प्रवर्गनिहाय आरक्षण व महिला आरक्षण तांदुळवाडी. – अनुसूचित जाती, उमरा – भ.ज.ब,अडगाव खुर्द – विशेष मागास प्रवर्ग, एदलापूर – अनुसूचित जाती, पणज – इतर मागास वर्ग, बोचरा – सर्व साधारण महिला, महागांव – इतर मागास वर्ग, वडाळी देशमुख – सर्व साधारण, चंडीकापुर – एस.ई.बी.सी., कुटासा भाग-2 – वि.जा.अ, कावसा बु.- सर्व साधारण, जऊळखेड बु. – इतर मागास वर्ग महिला, देवरी – ई.डब्लू.एस , बळेगांव – अनुसूचित जाती महिला, आकोलखेड – सर्व साधारण, आंबोडा – सर्व साधारण महिला, पुंडा – इतर मागास वर्ग, केळीवेळी – ई.डब्लू.एस.महिला, देवर्डा – एस.ई.बी.सी.महिला.अशाप्रकारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती अकोट उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
