गोठ्याला लागलेल्या आगीत दोन जनावरांचा भाजून मृत्यू.शेती साहित्याची राख

गोठ्याला लागलेल्या आगीत : दोन जनावरांचा भाजून मृत्यू.शेती साहित्याची राख

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील ग्राम तिवळी येथील शेत शिवारात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी अचानक आग लागून त्यामध्ये दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आगीत शेती साहित्य जळून राख झाले आहे .याबाबत सविस्तर माहिती अशी की ग्राम तीवळी येथे काल दिनांक 7 सप्टेंबर रोजी 4ते 5 वाजता च्या दरम्यान सय्यद मुसा यांच्या शेतात जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली या आगीमध्ये त्यांची दोन जनावरे जळून मृत्यूमुखी पडले आहेत या आगीची घटना गावामध्ये कळताच गावातील लोकांनी तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशन व अग्निशमन दलाला फोन केला दरम्यान शिरपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेता विलंबन न लावता घटनास्थळी आपल्या ताफ्यासह धाव घेऊन आग विझवण्यासाठी सहकार्य केले. तत्पूर्वी ग्रामस्थांनीही या कामी मदत केली ही आग विझवण्या साठी मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीमध्ये शेख मुसा यांचे गोठाबरोबरच दोन जनावरे मृत्युमुखी पडली असून व इतर जनावरही जखमी झाली आहेत यामध्ये शेख मुसा यांचे शेती साहित्य जळून खाक झाले त्यामध्ये बैलगाडी ताडपत्री दोन पाण्याचे टाक्या तसेच स्प्रे पंप यासह शेती उपयोगी साहित्य व लाकूड फाटे हे जळून त्यांची बरेच नुकसान झाले शिरपूरच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी वेळीच दखल घेऊन त्यांनी आगझविण्या साठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल तीवळी वासियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करीत आहेत. आगीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी करीत आहेत या घटनेचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने तलाठी यांनी केला आहे ही आग विझवण्यासाठी गावातील संदीप लहाने, गुलाब नबी, विनायक, पठाण, सद्दाम सय्यद राजीक, शिवाजी पाटील, बकाल, कैलास लहाने, सचिन लहाने व गावकरी मंडळींनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *