अकोट ते हिवरखेड मार्गावर मजुरांची ट्रॉली पलटी एकाचा मृत्यू,पाच गंभीर जखमी

अकोट ते हिवरखेड मार्गावर मजुरांची ट्रॉली पलटी एकाचा मृत्यू,पाच गंभीर जखमी

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट बांबू कापण्यासाठी जात असलेल्या मजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अकोट ते हिवरखेड मार्गावरील उमरा फाट्यानजीक मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला.ट्रॉली पलटी झाल्याने झालेल्या या दुर्घटनेत २४ वर्षीय सुरेश बल्लू बावसकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार जामनेर भुसावळ परिसरातून मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात बांबू कापणीच्या कामासाठी मजूर ट्रॅक्टर ट्रॉलीने जात होते.अकोट ते हिवरखेड मार्गावरील उमरा फाट्यानजीक आल्यानंतर ट्रॉली अचानक पलटी झाली.या अपघातामुळे ट्रॉलीतील मजुरांमध्ये एकच खळबळ उडाली.दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.या भीषण अपघातात सुरेश बल्लू बावसकर (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य पाच मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच पोपटखेड येथील वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.तसेच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान मृतक सुरेश बावसकर यांचा मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रस्त्यावरील खड्डे उखडलेला मार्ग आणि सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *