
नांदुरा भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार?माहिती अधिकार कार्यकर्ते शंकर राठोड (राणे) यांना सुनावणीचे पत्र; दिनांक नमूद, मात्र वेळच नाही!
नांदुरा:-(राहुल चोपडे) :
नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहिती अधिकारांतर्गत प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते शंकर राठोड (राणे) यांना संबंधित कार्यालयाकडून सुनावणीचे पत्र पाठविण्यात आले आहे.मात्र या पत्रामध्ये सुनावणीची दिनांक नमूद करण्यात आली आहे; मात्र सुनावणीची निश्चित वेळ नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे संबंधित सुनावणीस नेमक्या कोणत्या वेळी उपस्थित राहायचे, याबाबत कार्यकर्ते शंकर राठोड (राणे) संभ्रमात पडले होते.सुनावणीसंदर्भातील पत्रव्यवहारामध्ये दिनांकासोबत निश्चित वेळ व ठिकाण स्पष्ट असणे आवश्यक असताना वेळ नमूद न केल्याने कार्यालयीन कार्यपद्धतीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.माहितीचा अधिकार हा नागरिकांना प्राप्त कायदेशीर अधिकार असून, त्याअंतर्गत होणाऱ्या सुनावणी प्रक्रियेत अर्जदाराला आवश्यक ती स्पष्ट माहिती मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सुनावणीची वेळच नमूद नसल्याने संबंधित अर्जदाराला अनावश्यक संभ्रम व गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे शंकर राठोड (राणे) यांनी म्हटले आहे. सदर पत्रामध्ये वेळ का नमूद करण्यात आली नाही याचे कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.या प्रकारामुळे नांदुरा भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
