विद्यांचल द स्कूल, अकोट येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

विद्यांचल द स्कूल, अकोट येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यांचल द स्कूल अकोट येथे शिक्षक दिन (गुरुत्व) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळच्या कार्यक्रमासाठी ‘गुरु-मेह’ ही संकल्पना (थीम) ठेवण्यात आली होती.४ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपला आदर व्यक्त केला. याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी स्वंयशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संचालिका सौ. सारिका भुतडा यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये शिक्षकांचे महत्त्व, त्यांची भूमिका आणि उद्देश स्पष्ट करण्यात आला. शिक्षकांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत शाळेत संगीत, नृत्य, गाणी, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदर पाहून सर्व शिक्षकांना आपण शिक्षक असल्याचा अभिमान वाटत होता.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सहकाऱ्यांचे अभूतपूर्व मार्गदर्शन लाभले, ज्यामध्ये श्री. विनायक दाते, श्री आशिष पंडागडे, रोहित नलोडे आणि पूजा रघुवंशी यांनी नृत्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर संगीतात श्री धिरज अढाऊ, श्री अभिजित वंडाळे, श्री गौरव सुरतने, सौ. मंजिरी नेरकर इत्यादींनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे यशस्वी समन्वय श्रीमती नेहा अग्रवाल, श्री दिपक कांबले, श्रीमती अलिफिया आलमदार, नृत्य विभाग आणि आर्ट अँड क्राफ्ट विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्कूल कॅबिनेटच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या केले.शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२६ रोजी शाळा व्यवस्थापनाद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर शाळेत आयोजित केलेला कार्यक्रम पाहायला मिळणे दुर्मिळ आहे.शिक्षक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापनाच्या वतीने दिवसभर शाळेत शिक्षकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये संगीत, नृत्य, गायन आणि खेळ आयोजित करण्यात आले होते. सकाळी ८:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला.कार्यक्रमात शिक्षकांसाठी नाश्ता, मिष्टान्न भोजन इत्यादींचाही समावेश होता. संचालक श्री. दिनेश भुतडा, सौ. सारिका भुतडा आणि प्रशासकीय प्रमुख श्री. प्रशांत विनायक यांनी या दिवसाच्या कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुबोध उज्जनकर आणि श्री.विनय अस्वार यांनी केले, तर स्वागतपर भाषण सौ. स्नेहल रावणकार यांनी दिले. शाळेच्या प्रशासकीय टीमने शिक्षकांना समर्पित नृत्य आणि उत्कृष्ट गीत सादर केले, ज्यामुळे सर्व शिक्षक भावविभोर झाले.दिवसभराच्या कार्यक्रमात अतिशय महत्त्वाचा आणि शिक्षकांनी वर्षभर केलेल्या मेहनत व परिश्रमासाठी कार्य गौरव समारोह संपन्न झाला. संख्या मोठी असूनही प्रत्येक शिक्षकाला भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष श्री नरेश भुतडा, सदस्य श्री. राजेश भुतडा प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते, ज्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या.शेवटी श्री अनिल आकोटकर यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *