अकोट येथे शिक्षक भारतीय उर्दू विभागाची सभा संपन्न

अकोट येथे शिक्षक भारतीय उर्दू विभागाची सभा संपन्न

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

आकोट येथे राजदीप लॉन सूर्या ढाबा येथे उर्दू विभागाची सभा संपन्न झाली.या सभेला मनोज देशमुख जिल्हा अध्यक्ष शिक्षक भरती अकोला तसेच शिक्षक भारतीचे विभागीय संघटक अमीन सर तसेच जमीर पटेल,विजय मानकर तालुकाध्यक्ष अकोट सोहेल सर यांनी मार्गदर्शन केले.या सभेला तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी बोलताना अमीन सर यांनी उर्दू शिक्षकांचा संघटन मजबूत करून संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक भरतीची का गरज आहे हे समजावून सांगितले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की शिक्षक भरती ही अशी संघटना आहे की जे राज्य नोंदणीकृत संघटना असून या संघटनेच्या सदस्यांचे सुद्धा एक महत्त्वाचे स्थान असते विजय मानकर यांनि सुरेश देवकर यांची उमेदवारी का आवश्यक आहे तसेच शिक्षक भरती एक स्वतंत्र संघटना असून कोणत्याही राजकीय पक्षाशी तिचा संबंध नसल्याने शिक्षकांचे प्रश्न कोणतेही सरकार असल्यास अधिक मजबूत देणे सोडवून घेण्याची धमक या संघटनेमध्ये असल्याचे मत प्रतिपादन केले.जमीर पटेल यांनी सुद्धा संघटनेला समर्थन करून संघटना वाढीसाठी संघटनेने प्रयत्न करावे असा विश्वास व्यक्त केला.या सभेचे सुंदर संचालन वसीम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय गावंडे सचिव शिक्षक भरती अकोट यांनी केले.या सभेला अब्रार हुसेन सर,शारीक सर,सकलेन सर,माजीद सर,अबसार सर,मूतालीब सर,शारीक सर व बहुसंख्य उर्दू विभागाचे शिक्षक बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *