अकोटात ५० फुटी रावणाचे दहन; दसरा महोत्सवाला ६८ वर्षांची परंपरा

अकोटात ५० फुटी रावणाचे दहन; दसरा महोत्सवाला ६८ वर्षांची परंपरा श्री सिंध नवजवान मंडळाची जय्यत तयारी; आतषबाजीसह भव्य सोहळा रंगणार

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

विजयादशमीच्या पर्वावर अकोट शहरात होणाऱ्या पारंपरिक रावण दहन सोहळ्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. श्री सिंध नवजवान दसरा महोत्सव मंडळातर्फे यंदा ६८ व्या वर्षी दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भव्य रावण दहन होणार आहे.सिंधी समाजाच्या पुढाकारातून सुरू झालेली ही परंपरा गेल्या ६७ वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. यंदा ५० फुटांहून उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन, आकर्षक आतषबाजी आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषात हा सोहळा पार पडणार आहे. सत्याचा असत्यावर विजय हा संदेश देणाऱ्या या महोत्सवाला दरवर्षी अकोट शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित राहतात.या कार्यक्रमाला आमदार प्रकाश भारसाकळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री सुधाकर गणगणे, माजी मंत्री रामदास बोडखे, माजी आमदार संजय गावंडे, नगराध्यक्ष मायाताई धुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धीरज हिंगणकर, उपसभापती विजय मंडळाचे रहाणे व संचालक मंडळ तसेच डॉ. विशाल इंगोले यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष हेमंत मोटवानी, उपाध्यक्ष आकाश पारवाणी, कार्याध्यक्ष मोतीलाल तेजवाणी यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी परिश्रम घेत आहे.या पारंपरिक आणि ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अकोटकर नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फ करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *