मामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनोद चिपडे यांच्या पुढाकारातून सात बाकड्यांची भेट

मामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनोद चिपडे यांच्या पुढाकारातून सात बाकड्यांची भेट

जळगाव जामोद

दिवंगत मामा गोविंद चंद्रभागा दगडू मांडवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकार विनोद चिपडे यांच्या पुढाकारातून त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पांडुरंग चिपडे यांच्याकडून जळगाव जामोद व सावरगाव येथील तीन मंदिरांना सहा बाकडे सप्रेम भेट देण्यात आले. तसेच मीनाताई मंगेश बावस्कर यांनी जळगाव जामोद येथील मारुती मंदिराला एक बाकडा भेट दिला. त्यामुळे तीन मंदिरांना एकूण सात बाकड्यांची भेट मिळाली आहे.
जळगाव जामोद येथील मारुती मंदिराला दोन, सावरगाव येथील मारुती मंदिराला दोन, तर सावरगाव येथील जगदंबा देवी मंदिराला दोन बाकडे देण्यात आले आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमावेळी मारुती मंदिराशी संबंधित भागवत सर, पिंटू भाऊ मासाळ, यशवंत झुंजारे, श्रीकृष्ण काळे, भागवत पाटील, समाधान पाटील, अरुण कराळे आणि सुरेश पाठक यांच्यासह मंदिरांशी संबंधित पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत उपस्थितांनी विनोद चिपडे, त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई चिपडे आणि मीनाताई मंगेश बावस्कर यांचे आभार मानले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या अरुण कराळे, सुरेश पाठक, भागवत पाटील, समाधान पाटील यांच्यासह उपस्थितांचेही योगदान व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
दिवंगत मामांच्या स्मृती जपत धार्मिक स्थळांवर येणाऱ्या भाविकांसाठी उपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपण्यात आला आहे. प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *