
ऋषिपंचमी यात्रा महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
वरूर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समर्थ सद्गुरू संत गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ऋषिपंचमी यात्रा महोत्सव व तुळशी बिल्वदल अर्चन नामसंकीर्तन अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.हा सप्ताह दि.८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ असा आठ दिवस चालणार आहे.या सप्ताहात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजनाने दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ८ ते १० या वेळेत विष्णुसहस्त्रनाम व शिवसहस्त्रनाम पठणासह तुळशीदल व बिल्वदल वाहण्याचा अर्चन सोहळा होईल. दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ४ या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण होईल. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या हरीकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.कीर्तन महोत्सवात दि.८ रोजी ह.भ.प.राम महाराज गव्हारे (सांगळूद)दि.९ रोजी ह.भ.प.गजानन महाराज दहीकर (बुलडाणा)दि.१० रोजी ह.भ.प.नंदू महाराज ढेंगे (म्हातोडी)दि.११ रोजी ह.भ.प.किशोर महाराज काळे (तामसी)दि.१२ रोजी ह.भ.प.राजेंद्र महाराज वसते (पाळोटी)दि.१३ रोजी ह.भ.प.अरुण महाराज लांडे (पारस)दि.१४ रोजी ह.भ.प.वासुदेव महाराज खोले गुरुजी यांची कीर्तन सेवा होईल.ऋषिपंचमीचा मुख्य सोहळा दि.१५ सप्टेंबर रोजी होईल.त्या दिवशी सकाळी ५ ते ६ श्रींच्या मूर्तीचा अभिषेक,सकाळी ७ ते १० वरूर जऊळका संतनगरीतून श्रींच्या मुखवटा व पादुकांसह भव्य दिंडी सोहळा काढण्यात येईल.सकाळी १० ते १२ ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांचे काल्याचे कीर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या संपूर्ण सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प.अवधूत महाराज पारसकर हे करणार असून योग योगेश्वर संस्थान विश्वस्त मंडळ व समस्त भक्तगण मंडळी वरूर जऊळका यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
