
या काळाच्या दिवसा पाव माझ्या नवसा शाहिर गौतम जाधव यांनी शाहिरीतून मांडली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा शाहिरी डफाचा कडकडाट आणि गाण्याचे बोल “या काळाच्या दिवसा पाव माझ्या नवसा, येरे येरे पावसा”
सिंदखेड राजा प्रतिनिधी विशेष बातमी
राज्यात निर्माण झालेल्या गंभीर कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, बळीराजाच्या वेदना आणि मनातील आर्त टाहो शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध शाहिर गौतम जाधव निर्माते यांनी “या काळाच्या दिवसा पाव माझ्या नवसा, येरे येरे पावसा ” हे विशेष व्हिडिओ गीत सादर केले असून विशेष मोलाचे सहकार्य अमर जाधव, गोरख राठोड,प्रभू डोके, रोहित म्हस्के,तानाजी शिनगारे, बबन खरात,महेंद्र म्हस्के, तानाजी म्हस्के,गजानन कहाळे,ज्ञानदेव ससाने, अधिकार घेवंदे,छायाचित्रिरण विजय भालमोडे, रेकॉडिंस्ट आकाश हाजगुडे,दिग्दर्शक संकलन महेंद्र भारसाखळे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे”पिण्याच्या पाण्याची टंचाई डोळ्यांसमोर जळणारी पिके आणि डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर राज्यात निर्माण झालेल्या गंभीर कोरड्या दुष्काळामुळे आज आमचा बळीराजा पुरता खचून गेला आहे “आपल्या खणखणीत शाहिरीच्या माध्यमातून शाहिर गौतम जाधव यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाची वास्तववादी परिस्थिती मांडली आहे. पिण्याच्या पाण्याचे हाल, वाळणारी पिके आणि डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे खचलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या मदतीची आणि पावसाची कशी नितांत गरज आहे, हे या गीतातून अतिशय प्रभावीपणे रेखाटले आहे.
शेतकऱ्यांच्या या भावनांना वाचा फोडणारे हे व्हिडिओ गीत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी या शाहिरीच्या माध्यमातून लावून धरली जात आहे.
